एसटीचे अमृतमहोत्सवी वर्ष व वर्धापन दिन सोयगाव बस स्थानकावर साजरा
सोयगाव : एसटीचे अमृतमहोत्सवी वर्ष व वर्धापन दिन सोयगाव बस स्थानकावर साजरा करण्यात आला.
यावेळी संपूर्ण स्थानक रांगोळी व पताकांनी सजावट करण्यात आली होते.वर्धापन दिनानिमित्ताने एसटीच्या मान्यवरांचे हस्ते पूजन करून व केक कापून आतिषबाजी करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलताना सोयगाव पोलीसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट यांनी एसटी आणि जनतेचे अतूट नाते असल्याचे सांगितले. सुरक्षितता, तसेच बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्य प्रमाणे एसटीचे वाटचाल अविरत चालू असून एसटीच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगून त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले. यावेळी बोलताना त्यांनी एसटी संबंधित जुन्या आठवणींना उजाळा दिला दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगती होवो अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना आगार प्रमुख हिलाल ठाकरे यांनी सोयगाव आगाराने अडचनीतून मार्ग काढत कशी प्रगती साध्य केली याबाबत आढावा घेतला जनतेची सेवा ही उद्दिष्ट ठेवून आगाराचा अधिकाधिक नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले दिवसेंदिवस एसटी आधुनिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करीत असून प्रवाशांच्या वतीने एसटी प्रवासाला प्राधान्य देऊन राष्ट्राच्या विकासाला हातभार लावण्याचे आव्हान केले.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सोयगाव पेन्शनर संघटनेचे तालुकाध्यक्ष आबासाहेब बावस्कर, माजी मुख्याध्यापक पिंगाळकर, लेखापाल कावले, पत्रकार योगेश बोखारे पाटील, ईश्वर इंगळे, विशाल घन उपस्थित होते. या कार्यक्रमाला सोयगावकर जनता तसेच प्रवासी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी नागरगोजे, ज्ञानेश्वर वाडेकर, राहुल ठाकूर, वर्जन जाधव,के. बी.मिसाळ,संतोष पाखरे, वानखेडे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन सतीश पाटील यांनी तर आभारप्रदर्शन अण्णासाहेब ढेपले यांनी केले.