मलकापूर येथे “जोडा मारो आंदोलन”
मोताळा (संभाजी गवळी) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन नायक ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या कळमनुरी विधानसभेचा अडाणी व लायकी नसलेला आमदार संतोष बांगर याचा मलकापूर तालुक्याच्या वतीने तीव्र निषेध करीत तहसील चौकात त्यांच्या पुतळ्यास “जोडा मारो आंदोलन” करण्यात आले.
यावेळी बुलडाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, जी.संघटक भाऊराव उमाळे, तालुकाध्यक्ष सुशीलभाऊ मोरे, महीला जी.उपाध्यक्षा रेखाताई नीतोने, तालुकाध्यक्षा दक्षशिला झनके, शहर अध्यक्ष विलास गुरव, ता.महासचिव नरसिंग चव्हाण, भा.बौध्द म.तालुकाध्यक्ष राजू शेगोकार, नारायणराव जाधव, जगनभाई गवई, शेख यासीन कुरेशी, विलास तायडे, गजानन झनके, जनार्दन इंगळे, प्रवीण इंगळे, सचिन तायडे, संतोष इंगळे, सतीश काजळे, मधुकर निकम, डीगांबर मोरे, शहर अध्यक्षा अलमनुरबी, लताबाई गवई, रीनाताई इंगळे, कमलाकर इंगळे, धम्मपाल बोलके, भीमराज मोरे, सिद्धार्थ मोरे, किशोर तायडे, आनंदा वाकोडे, अजय इंगळे यांचेसह शेकडो महीला पुरुष उपस्थित होते.