मामाच्या गावाला जाण्यासाठी उन्हाळी सुट्टी मिळणार नाही ; शाळा एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ सुरु राहणार !
मुक्ताईनगर (सचिन झनके) राज्य सरकारने उन्हाळी सुट्ट्या बाबद मोठा निर्णय घेतला असून, शनिवारी ही पूर्णवेळ शाळा भरण्याचा आदेश देण्यात आला आहे शिवाय, रविवारी यांची स्वरूपात शाळा सुरू ठेवण्यात शालेय शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे यंदा चिमुकल्यांची मामाच्या गावाला जाण्याची संधी हुकणार असल्याचे दिसते. कोरोना मुळे गेले दोन वर्षे शाळा बंद असल्याने ऑनलाइन झालेल्या शिक्षण आणि अनेक मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले. सध्या कोरोनाची स्थिती सुधारली असून कोरोणा चा धोका कमी झाल्याने शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात आले होते.
दहावी – बारावीच्या परीक्षा ची ऑफलाइन पद्धतीने सुरू आहेत . पहिली ते नववी चे वर्ग सुरू आहेत हे वर्ग आता शंभर टक्के१००% उपस्थिती सह सुरु करण्यात शालेय शिक्षण विभागाने परवानगी.मात्र शनिवारी ही पूर्णवेळ शाळा भरण्याचा आदेश देण्यात आले असून रविवारी एेच्छिक स्वरूपात स्वरूपात शाळा सुरू ठेवणे असे शालेय शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. मार्चमध्ये परीक्षा कोण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळतात मात्र यंदा पूर्ण मार्च महिन्यातही व एप्रिल महिन्यात सुट्टी मिळणार नाही. कोरोना मुळे मागे पडलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी मार्च एप्रिल महिना मध्ये पूर्णवेळ शाळा सुरू राहणार आहे. तिसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने देण्यात आलेली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचा संपूर्ण वेळ शाळा परीक्षा या अभ्यासाच्या कालावधी मध्येच करणार आहे मामाच्या गावाला जाण्याच्या सुट्टी मिळणार नाही.



