महाराष्ट्र
कोकण विभाग अध्यक्षपदी गजानन पाटील, महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी राजेश उज्जैनकर तर ठाणे तालुका अध्यक्षपदी साईनाथ म्हात्रे यांची निवड
दिवा (सचिन शेलवले) महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टिस असोसिएशन (MESTA)चे संस्थापक डॉ. संजयराव तायडे पाटील यांनी गजानन काशिनाथ पाटील यांना कोकण विभाग अध्यक्ष व राजेश भास्कर उज्जैनकर यांना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणुन तसेच गणेश विद्या मंदिर दातिवली या संस्थेचे सचिव साईनाथ लक्ष्मण म्हात्रे यांची ठाणे तालुका अध्यक्ष म्हणुन नेमणूक केली .
त्यांनी महाराष्ट्र इंग्लिश स्कुल स्ट्रस्टिज असोसिएशन (MESTA) या वैचारिक चळवळी साठी आपला वेळ, पैसा, श्रम, बुद्धी, कौशल्य हे पंच दान देऊन संघटनेत सातत्याने कार्य करत आले आहेत. आपले शैक्षणीक क्षेत्रातील मोलाचे योगदान लक्षात घेता आपण केलेल्या कार्याची दखल घेत आपल्याला हेच कार्य व्यापक रीतीने करण्याची संधी मिळावी तसेच आपल्या माध्यमातून संघटन अधिकाधिक बळकट व्हावे. यासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.