राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते नवनिर्वाचित युवासेना पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप
सिल्लोड (विवेक महाजन) युवकांची मजबूत फळी निर्माण करून शिवसेनेचा विचार आणि मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी राज्यातील जनतेसाठी घेतलेले जनहितार्थ निर्णय घराघरात पोहचवून सामन्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देत त्यांच्या अडीअडचणीची सोडवणूक करणे हे प्रमुख काम युवासेनेचे असल्याचे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे केले.
८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या मूलमंत्राचे पालन करून आगामी प्रत्येक निवडणुकीत युवासेना मोलाची भूमिका निभावेल असा विश्वास देखील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.
सिल्लोड तालुक्यातील युवासेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. आज रविवार रोजी सिल्लोड शहरातील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सेना भवन येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थितीत युवा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. युवासेना पदाधिकारी कार्यकारणीच्या नियुक्ती बद्दल नवनिर्वाचित युवासेना पदाधिकाऱ्यांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख कैलास जाधव, जि. प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक शेख आमेर अब्दुल सत्तार , राजेंद्र ठोंबरे, मारुती वराडे , सतीश ताठे, युवासेना जिल्हा सरचिटणीस शेख इम्रान (गुड्डू) तालुकाप्रमुख धैर्यशील तायडे, शहरप्रमुख शिवा टोम्पे, आशिष कुलकर्णी, समाधान गोंगे, योगेश शिंदे, गौरव सहारे, सुधाकर बनकर, प्रवीण मिरकर, एकनाथ शिंदे, राहुल सपकाळ, संग्रामसिंग राजपूत आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.