समाजकार्य महाविद्यालयात सुशील शिक्षक पुरस्कार संजय बारी यांना प्रदान
चोपडा (विश्वास वाडे) भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयात स्व.डॉ. सुशीला बेन शहा यांच्या जयंतीनिमित्त भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलातील अध्यापकास संस्थेमार्फत सुशील शिक्षक पुरस्कार संजय बारी यांना माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंडे, डॉ बी व्ही पवार कुलगुरू कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, यजुवेंद्र महाजन संस्थापक दीपस्तंभ फाँऊंडेशन जळगाव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी चोपडा तालुक्यातील उद्योजक यांचा देखील सन्मान व सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी वसंतम् O२ झोन प्राणायाम व योगासन वाटिकाचे उद्घाटन करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी शिक्षक आमदार प्रा दिलीपराव सोनवणे, चोपड्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावळे, डॉ. विकास हरताळकर, जिल्हा बँकेचेसंचालक घनश्याम अग्रवाल, पीपल बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, गोरख तात्या पाटील, नगरपालिकेचे गटनेते जीवन चौधरी, अशिष भाई गुजराथी, पुनम गुजराथी, छाया बेन गुजराथी शहरातील उद्योजक यांच्यासह शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.