श्री. सर्वेश्वर महादेव मंदिर येथे सभामंडप साठी निधी उपलब्ध करून देवू : राज्यमंत्री अब्दुल सत्तार
सिल्लोड (विवेक महाजन) शहरातील समता नगर भागातील श्री. सर्वेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, संगीतमय श्रीमदभागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळा प्रसंगी महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रोजी भेट दिली.
यावेळी आयोजकांच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजकांनी येथील मंदिर समोर सभागृहाची मागणी केली असता श्री. सर्वेश्वर महादेव मंदिर समोर सभामंडप साठी १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देवू तसेच येत्या मार्च महिन्यानंतर या कामाचे उदघाटन करण्यात येईल अशी ग्वाही याप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेसी, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, संचालक शेख जावेद, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, मारुती वराडे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, मतीन देशमुख, युवा सेनेचे अक्षय मगर, राम कटारिया, फहिम पठाण, राजू देशमुख, पत्रकार प्रकाश वराडे यांच्यासह महिला भजनी मंडळ, रुईहनुमान भजनी मंडळाचे सदस्य व समता नगर, शिक्षक नगर भागातील नागरिकांची उपस्थिती होती.