चोपडा (विश्वास वाडे) आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल अपमानजनक व धमकी देणारे वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवून त्वरित अटक यावी, या आशियाची मागणी आज निवेदनाद्वारे चोपडा तालुका भारतीय जनता पार्टी व ओबीसी आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
यावेळेस उपस्थिती अँड एच डी सोनवणे, गजेंद्र जैसवाल, शहर अध्यक्ष भरत बाविस्कर, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, युवा मोर्चा हनुमंत महाजन, तालुका सरचिटणीस अध्यक्ष जितेंद्र पाटील, परेश धनगर, योगेश पाटील, निरज सुराणा, मनोहर बडगुजर, सरचीटणीस सिमा सोनार, महिला मोर्चा उपाध्यक्ष सुरेश चौधरी, ओबीसी मोर्चा सुनिल सोनगिरे, यशवंत जडे, गोपाल पाटील, शेखर सोकी आदी उपस्थित होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व वाचाळवीर नाना पटोले यांनी काल भंडारा जिल्ह्यातील एका निवडणुकीच्या* प्रचारादरम्यान ” मि मोदीना मारू शकतो व मि मोदीना शिव्या ही देऊ शकतो” असे बेताल वक्तव्य करून आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमानच केलेला नाही तर एक प्रकारे पंतप्रधान यांना धमकी देणारे वक्तव्य केले. यावरून काँग्रेसची मोदीजी बद्दलची शत्रुत्वाची भावना स्पष्ट होते.
या वक्तव्यच्या निषेधार्त आम्ही भारतीय जनता पार्टी व ओबीसी मोर्चा चोपडा तालुक्यातील पदाधिकारी सदर निवेदनामार्फत मागणी करतो की असे बेताल वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांच्याविरुद्ध त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. अन्यथा भाजपा व ओबीसी मोर्चा तीव्र आंदोलन करण्यात येईल.