महाराष्ट्र
श्री साईबाबा सस्थांन व साईबाबा ऊत्सव समितीच्या वतीने राजू शेळके यांचा सत्कार
बोदवड (सतीश बाविस्कर) दर गुरुवारी दुपारी १२ वाजता महाआरती व महाप्रसाद श्री साई बाबा मंदिर येवती जामठी बोदवड रोडवर पंचक्रोशित ग्रामस्थ यांच्या सहकार्याने साईबाबांची आरती व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. आज गुरुवार रोजी राजु चांगो शेळके यांनी साईबाबा चरणी सेवा अर्पण केली.
यावेळी श्री साईबाबा सस्थांन व साईबाबा ऊत्सव समितीच्या वतीने राजू शेळके यांचा साईबाबा प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
याठिकाणी आपल्या इच्छेनुसार दर गुरुवारी साईबाबा चरणी महाआरती व महाप्रसाद सेवा दिली जाते. या ठिकाणी ज्यांना सेवा द्यायची आहे. त्यांनी आपल्या नावाची नोंदणी करावी. तसेच नवीन वर्ष २०२२ ची नोंदणी करणे चालू आहे.



