महाराष्ट्र

नगर परिषदेच्या वतीने ईदगाह येथे करण्यात आल्या उपाययोजना

उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केली पाहणी

सिल्लोड : रमजान ईद सण अगदी दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. कोरोना संकटामुळे दोन वर्षानंतर यावर्षी ईदगाह येथे मुस्लिम बांधव एकत्रितपणे नमाज अदा करणार आहेत. त्यानिमित्ताने नगर परिषद व प्रशासनाच्या वतीने येथे विविध उपाययोजना करण्यात आल्या असून करण्यात आलेल्या उपाययोजनांची उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी ईदगाह येथे प्रत्यक्ष पाहणी करून याबाबत आढावा घेतला.

रमजान ईद निमित्ताने शहरात सुरळीत पाणी पुरवठा, तसेच वीज पुरवठा व्हावा यासाठी सज्ज राहून नगर परिषदेने ईदगाह परिसरासह शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तर रमजान ईद सण उत्साहात व शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे याप्रसंगी म्हणाले.

पवित्र रमजान ईद सनानिमित्त सिल्लोड येथील मुस्लिम समाजबांधव ईदगाह येथे नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा देतात. तसेच मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी सर्व धर्मीय नागरिकांची या ठिकाणी गर्दी असते. त्यामुळे ईदगाह परिसरात येणाऱ्या नागरिकांना जास्तीतजास्त सोयीसुविधा कशा देता येईल यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात असे अब्दुल समीर म्हणाले.

यावेळी पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, राजू गौर, हाजी मोहमद हनिफ, योगेश दिवटे, सरदार खा, नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी अजगर पठाण, मोईन पठाण, मुश्ताक देशमुख, अझीम शेख, फहीम पठाण आदींसह नगर परिषद, वीज वितरण विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे