महाराष्ट्र

ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचं निधन

मुंबई (प्रतिनिधी) इंडियन एक्स्प्रेस समूहात प्रदीर्घ काळ पत्रकारिता केलेले ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचं निधन झालं आहे. ते ८१ वर्षांचे होते. सध्या ते लोकमत वृत्तपत्र समूहात समन्वय संपादक म्हणून कार्यरत होते. मुंबईतील नानावटी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी मराठी पत्रकारितेत ५० वर्षांहून अधिक काळ योगदान दिलं.

दिनकर रायकर यांना डेंग्यू आणि करोनाचा संसर्ग झाला होता. उपचारानंतर डेंग्यू बरा झाला. त्यानंतर फुप्फुसातील संसर्ग झाला होता. नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. गुरुवारी रात्री त्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह आली होती. शुक्रवारी पहाटे त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींचा अभ्यासक हरपला, अशा शब्दांत विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

५० वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत योगदान

दिनकर रायकर यांना पत्रकारिता क्षेत्रात ५० वर्षांहून अधिक अनुभव होता. इंडियन एक्स्प्रेसच्या मुंबई आवृत्तीचे चीफ रिपोर्टर, लोकसत्ताचे सहाय्यक संपादक, दैनिक लोकमत आणि लोकमत टाइम्सच्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. सध्या ते लोकमत वृत्तपत्र समूहात समन्वय संपादक म्हणून कार्यरत होते. त्यांना पुढारीकार ग. गो. जाधव पुरस्कार, सुशीलादेवी देशमुख पत्रकारिता पुरस्कार, कृषीवलकार प्रभाकर पाटील पत्रकारिता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे