महाराष्ट्र
घारीवली गावातील मोफत कोविड लसीकरण शिबिर यशस्वीपणे संपन्न
डोंबिवली : मनसे पक्षाचे नेते आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घारीवली गावाचे माजी सरपंच तथा मनसे डोंबिवली शहराचे शहर संघटक योगेश रोहिदास पाटील यांच्या अथक प्रयत्नाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने डोंबिवली पूर्व विभागातील कल्याण-शीळ रोड वरील घारीवली गावातील गणपती मंदीर येथे मोफत कोविड लसीकरण शिबिर संपन्न झाले.
सदर मोफत कोविड लसीकरण शिबिरामध्ये घारीवली गाव तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी सहभाग घेऊन शिबीर यशस्वी केले.