ज्येष्ठ पत्रकार गो.पी. लांडगे यांना राज्याचा माणुसकी सेवा गौरव पुरस्कार ; शनिवारी नाशिक येथे सन्मान
धुळे (करण ठाकरे) पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार गो.पी. दादा लांडगे यांना नाशिक येथील माणुसकी सोशल फाऊंडेशन संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्यावतीने राज्यस्तरीय ‘माणुसकी सेवा गौरव पुरस्कार २२’ जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ व विधानसभा उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ना. नरहरी झिरवळ यांच्या हस्ते शनिवारी त्यांनापुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
नाशिक येथील भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फाऊंडेशन संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने राज्यस्तरीय ‘माणुसकी सेवा गौरव पुरस्कार-२२’ साठी समाजाप्रती दिलेल्या अतुलनीय योगदानाबाबत राज्यभरातील विविध क्षेत्रातील बारा मान्यवरांना पुरस्कार घोषीत करण्यात आले असून हे पुरस्कार शनिवार दि. २६ फेब्रुवारी रोजी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ व विधानसभा उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ना. नरहरी झिरवळ आदी मान्यवरांच्या हस्ते हॉटेल ग्रॅण्ड अश्विन, पाथर्डी फाटा, नाशिक येथे सकाळी ११ वाजता प्रदान करण्यात येतील. अशी माहिती ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी एका पत्रकाद्वारे दिली. ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी नाशिक जिल्हात लावलेलं ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे रोपटं बाळस धरून सर्वांना समवेत घेऊन १ वर्ष पूर्ण करून अखंड व अविरतपणे महाराष्ट्रभर ‘जागो ग्राहक’ ही चळवळ घेऊन दुसऱ्या वर्षातील पदार्पणानिमित्त हे पुरस्कार घोषित करण्यात आले असून पुरस्कारार्थीमध्ये- १) अशोककुंदप सर ( लेखक व साहित्यिक, सातारा जिल्हा), २) पुरुषोत्तम पगारे सर ( ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक), ३) अरुणा अनिल अलई (सामाजिक क्षेत्रात महिला बचत गट, रोजगार या माध्यमातून कार्य, जळगाव जिल्हा), ४ शिवानंदन पांचाळ (सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य, नांदेड जिल्हा, ता. नायगाव), ५) देवेंद्र भुजबळ (विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे, नवी मुंबई जिल्हा), ६) निलम सदानंद पाटील (कवयित्री, अनेक पुरस्कारांनी सन्मानित, पालघर जिल्हा), ७) गोरखनाथ पितांबर लांडगे (ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते, धुळे जिल्हा), (८) रविकिरण गळंगे (शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात अनेक पुरस्कारांनी सन्मानित, पुणे ई जिल्हा), ९) डॉ. भुषण प्रविण, देशमुख (वैद्यकीय क्षेत्रात अनेक पुरस्कारांनी सन्मानित जळगाव व नाशिक), १०) जगदीश येडलावार (वनविभागीय अधिकारी तथा समाजसेवक, नाशिक), ११ ) भिमराव दामोदर शिरसाठ, १२) सुजय कैलास जाधव (सामाजिक क्षेत्रात, पालघर जिल्हा, आदर्श कामगार तथा पत्रकार व समाजसेवक ठाणे जिल्हा) यांचा समावेश आहे.