महाराष्ट्र

अनाधिकृत अतिक्रमणावर नगरपालिकाची कार्यवाही

भुसावळ (अखिलेश धिमान) भुसावळ नगरपालिकाच्या वतीने अनाधिकृत अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढून घ्यावे अशी नोटीस मागील दोन हप्तेपासुन सतत बजावणी व सूचना देण्यात येत असुन सुद्धा अतिक्रमणधारकांनी अवैधरित्या केलेली अतिक्रमण काढले नाही. त्याअनुषंगाने नगरपालिका ने टोकाचे पाऊल उचलत थेट तीन दिवसीय अतिक्रमण तोडो कार्यवाही सुरु केली.

सविस्तर वृत्त असे कि,‌दि.२४ ते २६ ही मोहिम राबविण्यात येत आहे. सदर मोहिम अंतर्गत संपूर्ण भुसावळ शहरात नगरपालिका हद्दीत झालेली अनधिकृत अतिक्रमण करुन बांधलेली दुकाने, घर, कार्यालय ई.वर थेट जेसीबी ने तोडण्याचे काम नगरपालिका ने शुरु केले दि. २४ रोजी जळगांव रोड, यावल रोड, तार आॅफिस रोड, गरुडप्लाट सह जामनेर रोड वरील अतिक्रमण काढ्यात आले. त्या वेळी हातावर पोट पोसणा-यांनी नजरे समोर आपले उद्योग उद्धवस्त होत असल्याचे पाहून हंबरळा फोडला. “एकीकडे कोरोना महामारी मुळे दोन वर्षापासुन त्रस्त होऊन काही महिन्यात गाडातोडा ला हातभार लागला परंतु नगरपालिका ने ही ते हिसकुन घेतला आम्ही जगु तरी कशे आता मरण्यापुढे काही पर्यायच नाही” अशे वक्तव्य करत काहींनी आक्रोश केला. काहींच्या महण्याप्रमाणेे “आम्हांस नोटीस मिळाली नाही आमचे घर कशाला तोडता साहेब” अशी विनंती सुद्धा करण्यात येत होती परंतु नगरपालिका ने प्रशासकीय कार्यवाही करण्याचा १५ दिवस आधीं दिलेली नोटीस व जाहीर सूचना चा हवाला देत आपली कार्यवाही सकाळी ९:०० ते संध्या ६:०० वाजे पर्यंत सुरु ठेवली व पुढील २ दिवस ही कार्यवाही अशीच सुरु राहणार अशी सूचना ही दिली. सदर कार्यवाही ही नगरपालिका चे मुख्याधिकारी यांचा मार्गदर्शनाखाली झाली असुन नगरपालिका अधिकारीगण,‌कर्मचारीगण, एमएसईबी कर्मचारींची उपस्थिती व चोख पोलिस बंदोबस्तात झाली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे