महाराष्ट्रराजकीय
काँग्रेसचे आज धरणे आंदोलन !
धुळे (प्रतिनिधी) केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना इडी व सीबीआय सारख्या यंत्रणांच्या माध्यमातून अटक करून दहशत निर्माण करीत आहे. केंद्र शासनाच्या या दडपशाहीच्या भूमिकेच्या विरोधात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या आदेशानुसार व कार्याध्यक्ष आ कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज दि. २५ रोजी सकाळी दहा ते बारा वाजेदरम्यान महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यात सहभागी व्हावे. तसेच महाविकास आघाडीच्या शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी देखील या आंदोलनात सहभाग घ्यावा असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर व शहराध्यक्ष प्रा शरद पाटील यांनी केले आहे.



