वैजापूरचे पोलीस निरीक्षक, उपविभागीय अधिकारी यांनी आंदोलकांशी केली चर्चा
वैजापूर (गहिनीनाथ वाघ) वैजापूर तालुक्यातील तहसील कार्यालय समोर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला एक वेगळेच वळण लागण्याचा अंदाज वैजापूरचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत आणि उपविभागीय अधिकारी कैलास प्रजापति यांनी आंदोलकांशी चर्चा केली.
लक्ष्मण राधाजी उघडे यांनी सांगितले की, आंदोलनाचे 158 दिवस पूर्ण होऊनही तहसीलदार राहुल गायकवाड यांच्याकडून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत आमची एकच मागणी आहे ती तहसीलदार राहुल गायकवाड व कृषी अधिकारी आढाव यांनी पिक विमा कंपन्या वर गुन्हा दाखल केला पाहिजे. तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल नाहीतर आम्ही 7 मार्च 2022 रोजी मी स्वातंत्रसेनानी लक्ष्मण राधाजी उघडे तहसील कार्यालयाला टाळे लावणार आहे. जर यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाल्यास याला जबाबदार प्रशासन राहील अशी चर्चा पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत व उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापति यांच्यात झाली.