बारावीच्या परीक्षेला सुरुवात ; शाळेकडून कोरोना नियमांचे पालन
भुसावळ (प्रतिनिधी) कोरोनाच्या काळानंतर आज ४ मार्च पासुन बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे भुसावळसह तालुक्यात १८ केंद्रावर बारावीची परीक्षा शांततेत होत आहे. परीक्षा हाँल मध्ये जाण्याआधी विद्यार्थ्यांच्या हातावर सँनिटायझर करून टेंपरेचर तपासून विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडण्यात येत आहे. कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन शाळेकडून केले जात आहे.
कोरोना काळानंतर दोन वर्षांनी बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑफलाइन परीक्षा होत आहे अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण नाही. भुसावळमध्ये सात मुख्य केंद्र व अकरा उपकेंद्र असून अठरा केंद्रावर बारावीची परीक्षा शांततेत सुरू असल्याचे गट शिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने विद्यार्थ्यांना यापूर्वीच परीक्षेविषयी सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक केंद्र संचालक व मुख्याध्यापकाने परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांना सूचना दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी ४५ मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर पोहोचायचे आहे. दरवर्षी परीक्षा ११:००वाजता सुरू होते. यावर्षी कोरोना काळामुळे विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव नसल्यामुळे त्यांना तीस मिनिटे जास्तीचा वेळ देण्यात आला असून अकरा वाजे ऐवजी पेपर साडेदहा वाजता सुरू होत असल्याचे केंद्र संचालक नितीन किरंगे यांनी म्हटले आहे.