गुन्हेगारी

घरगुती वापराचा गॅस वाहनात भरून देवून विक्री करणाऱ्यासह एकाला धुळे पोलिसांनी केली अटक

धुळे (प्रतिनिधी) शहरात साक्रीरोड पांझरा नदी किनारी बहावलपुरी भवनाच्या मागे पाटकिनारी चौपाटी रस्त्यास लागुन के. जी एन नावाची भंगार दुकाच्या एका पत्री टपरीच्या आडोश्याला धुळे पोलिसांच्या शोधपथकाने कारवाई करत घरगुती वापराचा गॅस वाहनात भरून देवून विक्री करणाऱ्यासह एकाला अटक करण्यात आली आहे. यावेळी २ लाख ५ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत अधिक असे की, धुळे शहर व जिल्हयातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करून अवैधरित्या घरगुती वापराचा गॅस इंधन म्हणून वाहनामध्ये भरणाऱ्या गॅस माफियांवर कारवाई करणेबाबत अपर पोलीस अधीक्षक धुळे, सर्वच प्रभारी अधिकारी धुळे जिल्हा यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने धुळे शहर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नितीन देशमुख यांनी यापूर्वी अवैधरित्या घरगुती वापराचा गॅस इंधन म्हणून वापरणाऱ्या वर कारवाई केली होती. यापूर्वी केलेल्या कारवाईत सातत्य राखत धुळे शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नितीन देशमुख यांनी शोधपथकास आदेशीत करुन खालीलप्रमाणे कारवाई केली आहे.

धुळे शहरात साक्रीरोड पांझरा नदी किनारी बहावलपुरी भवनाच्या मागे पाटकिनारी चौपाटी रस्त्यास लागुन के.जी एन नावाची भंगार दुकाच्या एका पत्री टपरीच्या आडोश्याला एकबाल शेख नावाचा इसम बेकायदेशीररित्या घरगुती वापराचा सिलेंडरमधील गॅस चारचाकी वाहनामध्ये इंधन म्हणुन भरुन देवून विक्री करीत आहे. बाबत पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळालेल्या बातमीची खात्री करुन छापा कारवाई करणेकामी शोधपथकास आदेशीत केले त्यावरुन दि. ०४/०३/२०२२ रोजी ००:३५ वा चे सुमारास धुळे शहरात साक्रीरोड पांझरा नदी किनारी बहावलपुरी भवनाच्या मागे पाटकिनारी चौपाटी रस्त्यास लागुन के. जी एन नावाची भंगार दुकाच्या एका पत्रटी टपरीच्या आडोश्याला शोधपथकाने कारवाई करून भारतीय कंपनीचे १३ गॅस सिलेंडर, त्यात १३ पूर्ण सीलबंद व १ अर्ध भरलेले गॅस सिलेंडर, एच. पी कंपनीचे ५ गॅस सिलेंडर त्यात ३ अर्ध भरलेले व २ रिकामे गॅस सिलेंडर, एक अविष्कार कंपनीची १.५ एचपी समतेचा पंप व इंटेक्स कंपनीची इलेक्ट्रिक मोटार, एक लोखंडी इलेक्ट्रॉनिक वजन काटा, 14 चाकी मारुती कंपनीची, असा एकूण २ लाख ५ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, घरगुती वापराचा गॅस वाहनात भरून देवून विक्री करणारा एकबाल शेख अब्दुल रऊफ (वय ४५. रा. महाले नगर मोगलाई कब्रस्तान जवळ, साक्रीरोड धुळे) हा चारचाकी मारुती कंपनीची पांढऱ्या रंगाची कार क्र.एम.एच १८ व्ही १४४ मध्ये बेकायदेशीररित्या घरगुती वापराचा गॅस इंधन म्हणुन भरवुन घेणारा रविंद्र सखाराम मोरे (वय ३५. रा. पांझरा नदी किनारी, समतानगर जवळ, चौपाटी रोड धुळे) यांना ताब्यात घेण्यात आले. त्याबाबत धुळे शहर पोलीस ठाणे येथे गुरनं. १३५ / २०२२ भादवि क.२८५ व दि.लिक्वीफाईड पेट्रोलियम गॅस रेगयुलेश ऑर्डर सन २००० चे कलम ३ (१) चे उल्लघंन व जिवनावश्यक वस्तु कायदा कलम ३ चे उल्लघंन ७(१) अ (ii) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोहेकॉ/२८९विलास भामरे करीत आहेत.

सदरची कारवाई अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे नितीन देशमुख, शोधपथकाचे पोहेकॉ/मुक्तार मन्सुरी, विलास भामरे, पोना/रुपेश मनिखेडकर, कुंदन पटाईत, पोकॉ/ शाकीर शेख, निलेश पोतदार, योगेन्द्र पाटील, प्रशांत बागुल, अविनाश कराड अशांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे