शिंदखेडा तालुक्यात आगामी सण उत्सव, नगर परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनला दंगा काबू पथकाची रंगीत तालीम
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा व दोंडाईचा येथे शहरातील आगामी सण उत्सव व नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली व तसेच शहरातील संवेदनशील भागासह विविध भागात पथसंचलन करण्यात आले.
दोंडाईचा पोलीस स्टेशन पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जामा मज्जीद, तसेच महाराणा प्रताप पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डीआर बोर्डिंग हायस्कूल त्यामार्गे स्टेशन भाग इत्यादी भागात पथसंचलन झाले. त्यात दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड, शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, थाळनेर पोलीस स्टेशनचे ओली निरीक्षक उमेश बोरसे, शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, नरडाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे यांच्यासह 36 पोलिस अंमलदार 34 होमगार्ड 1 आर सी पी पथक यांनी सहभाग नोंदवला त्यानंतर शहरातील मिश्र वस्तीत व संवेदनशील भागातून पथसंचलन करण्यात आले. दंगा काबू योजनेची रंगीत तालीम व पथसंचलन अनेकांचे लक्ष वेधून घेत रस्त्यावर एकच गर्दी केली.