तळोदा महाविद्यालयात जागतिक ग्राहक पंचायत दिन साजरा
तळोदा (प्रतिनिधी) कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळोदा आणि तळोदा तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.आर. मगरे होते, प्रमुख अतिथी म्हणुन प्रा आर. ओ. मगरे, ए. डी. सूर्यवंशी व वाणी होते प्रमुख वक्ते म्हणून अँड जयेशभाई शहा उपस्थित होते. अँड जयेशभाई शहा यांनी ग्राहक संरक्षण कायदा व कायद्यातील तरतुदी यांची सखोल माहिती उपस्थितांना दिली. ग्राहकास आपले अधिकार व त्यांची जागृती व्हावी यासाठी नियोजन केले पाहिजे असे प्रतिपादन केले. तसेच ग्राहकांचे अधिकार अधिक स्पष्ट करून सांगितले.
विद्यार्थ्यांना विविध उदाहरण समजावून सांगितले विद्यार्थी हा महाविद्यालयाचा ग्राहक असतो.आणि त्याला ग्राहक म्हणून अधिकाराचा वापर कसा करावा याची ओळख करून दिली. त्याचे कर्तव्य देखील त्याने कसे पार पाडावे हे समजावून सांगितले तसेच आर.ओ. मगरे यांनी ही विद्यार्थ्यांना विविध जाहिराती व त्यांची फसवेगिरी उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ महेंद्र माळी यांनी केले प्रास्ताविक डॉ. एस एन शर्मा यांनी केले शंभराहून अधिक मुलांमुलींनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले व त्यांचे चांगल्या प्रकारे निरसनही झाले. यावेळी या कार्यक्रमाला रसिलाबेन देसाई, सौ तुरखिया, वाणी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.महेंद्र माळी तसेच डॉ. आर डि मोरे, डॉ. जी एम मोरे डॉ स्वप्निल वाणी आदी उपस्थित होते. आभार प्रदर्शन डॉ एस एन शर्मा यांनी केले.