युवा जादूगार चेतनकुमार यांना राष्ट्रीय जादूश्री पुरस्कार प्रदान
धुळे (प्रतिनिधी) धुळ्यातील युवा जादूगार म्हणून एकमेव ओळख असलेले चेतनकुमार उपध्याय यांना बाळशास्त्री जांभेकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला.वयाच्या 12 व्या वर्षांपासून अत्यंत कमी वयात जादूई क्षेत्रात वळून नावलौकिक केल्याने सद्या त्यांचे नाव चांगलेच चर्चेत आहे.त्यांनी जादू हे क्षेत्र व्यावसायिक दृष्टीने त्याच्या कडे न बघता जादूतून सामाजिक प्रबोधना कडे त्यांचा नेहमीच कल असतो.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ ही राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांचे नेतृत्व करणारी देशातील शासन मान्य संघटना असून या संघटनेच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.आंतरराष्ट्रीय जादुगार मधुगंधा इंद्रजीत यांच्या कडून जादुगार चेतनकुमार यांना राष्ट्रीय जादूश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चेतनकुमार यांना आतापर्यंत च्या कार्यकाळात कलाक्षेत्राशी निगडीत मिळालेले सन्मान व पुरस्कार
अन्याय अत्याचार निर्मूल समितीचा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान, अखिल भारतीय नाट्य परिषद, धुळे विभाग आणि के वाय के एम फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित रंगभूमी दिनानिमित्त कलाक्षेत्रातील सन्मान
युवकमित्र परिवार महाराष्ट्र राज्य आयोजित युवा संमेलन व युवा दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार प्रदान
पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था.भारत याचा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार2020 प्रदान
(IBM) जादूगारची आंतरराष्ट्रीय बन्धुत्व.बांगलादेश शाखा आयोजित इंटनॅशनल ऑनलाईन कॉम्पिटिशन मध्ये
१० देश पार्टीसिपेट झाले होते त्यामध्ये यांना इंटनॅशनल सर्टिफिकेट प्रदान.
कलाक्षेत्राशी निगडीत केलेले कार्य वा राबविलेले उपक्रम
जादूगार चेतनकुमार हे वयाच्या 12 व्या वर्षांपासून जादूचे प्रयोग करत आहेत, त्याच बरोबर त्यांनी आता पर्यत 500 पेक्षा अधिक प्रयोग महाराष्ट्रभर केले आहेत ,तसेच जादूच्या माध्यमातून गोरगरिबांना, लहान मुलाना, जेष्ठ नागरिकांना आनंद देण्यासाठी मोफत कार्यक्रम राबवतात, त्याच बरोबर के.वाय.के.एम फाऊंडेशनचे सहसचिव म्हणून देखील त्यांनी उब मायेची, लॉकडाऊन सेलिब्रेट विथ के.वाय.के.एम या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील कलाकार लाईव्ह रंगमंच उपलब्ध करून दिला आहे व अनेक कार्यक्रमांचे समनव्यक म्हणून कार्य व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. निवडणूकच्या काळात मतदार राजा जागा हो, वर्षभरात बेटी बचाओ बेटी पढाओ, पाणी वाचवा, एड्स, कोरोना व विविध सरकारी योजनांच्या जनजागृती साठी जादूच्या माध्यमातून कार्य सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात प्रशिक्षण देण्याचे कार्य व जनजागृतीपर पथनाट्य देखील त्यांनी केले आहे. बाळशास्त्री जांभेकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान होताच धुळ्यातील सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार सोहळा 13 मार्च 2022 रोजी कालिदास कला मंदिर नाट्यगृह ,नाशिक येथे प्रमुख पाहुणे लोकनेते महापौर सतीश नाना कुलकर्णी,अभिनेते हार्दिक जोशी (तुझ्या माझ्या संसाराला फेम सिधु) ,दै.प्रताप दर्शनचे संपादक विनोदजी कुलकर्णी, सोनी पैठणीचे संचालक संजयजी सोनी,फ्रवशी इंटरनॅशनल स्कुलचे अध्यक्ष रतनजी लथ,सुरेखा लहामगे शर्मा,आंतरराष्ट्रीय जादूगार मंत्रमुग्ध इंद्रजीत ,पूनम बिरारी इ.प्रमुख पाहुणे व पत्रकार संघ चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.महेंद्र देशपांडे च्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडला