हातभट्टी वर पोलिसांची धाड ; एकास अटक
तळोदा (दिपक गोसावी) भवर ता.तळोदा येथे एका कुडाच्या घराच्या आडोशाला कैलास नानू पाडवी हा हातभट्टी दारू बनविण्याच्या साहित्यासह पोलिसांना आढळून आला.
याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवार दिनांक १५ मार्च रोजी दुपारी १.१० वाजता भवर ता.तळोदा येथे एका कुडाच्या घराच्या अडोशाला कैलास नानू पाडवी हा हातभट्टी दारू बनविण्याच्या साहित्यासह आढळून आला असता ३ विटाची चूल त्यात लाकडे जळत असलेली दारू गळण्याची भट्टी, एक रबरी पाईप ठेवलेल्या पत्री ड्रमला जोडलेला,भट्टीवर ठेवलेला व मातीचा मुलामा लावलेला पत्र्याचा ड्रम, तसेच १००० रुपये किमतीचे दोन प्लास्टिकचे पाण्याने भरलेले ड्रम ,दारू गाळण्यासाठी उपयोगी पडणारे प्रत्येकी ड्रमची किंमत ५०० रुपये प्रमाणे तसेच १३ हजार ५०० रुपये किमतीचे प्लास्टिकचे महू फुलांचा सडका वॉश भरलेले २०० लिटरचे एकूण ३ ड्रम. असा एकूण ६०० लिटर वॉश, प्रति लिटर २० रुपये प्रमाणे एकूण किंमत १२ हजार रुपये व प्रत्येकी ड्रम ५०० रुपये प्रमाणे एकूण १५०० प्रमाणे. १८०० रुपये किमतीचे मातीचे ३ माठ त्यात प्रत्येकी ३० लिटर प्रमाणे एकूण ९० लिटर गावठी हातभट्टीची दारू उग्रवास असलेली प्रतिलिटर २० रुपये प्रमाणे तसेच १०० रुपये किमतीची एक स्टीलची कळशी दारू गाळण्यासाठी उपयोगात येणारी, असा एकूण १६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. वरील सर्व साधने ही हात भट्टीची दारू बनवण्याचे साहित्य होते तसेच तिची चोरटी विक्री करण्याच्या इराद्याने सदर इसमास कब्जात बाळगताना मिळून आला. म्हणून त्याच्याविरुद्ध पोलीस निरीक्षक सुनील तेजाबसिंग पाडवी स्थानिक गुन्हे शाखा नंदूरबार यांनी यांनी फिर्याद दिली असून आरोपी कैलास नानू पाडवी यांच्याविरोधात गुन्हा ५७/२०२२ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ई प्रमाणे नोंद करण्यात आला असून खबरी रिपोर्ट अधिकार मॅजिस्ट्रेट सो. यांच्याकडे देण्यात आले असून. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक यांचे मौखिक आदेशान्वये पुढील तपास पोलीस निरीक्षक राजकुमार जाधव यांना दिला आहे. सदर गुन्हा दाखल आमलदार संगीता बाविस्कर यांनी दाखल केला असून पुढील तपास राजकुमार जाधव पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.