मुक्ताईनगर पोलिसांनी गावठी हातभट्टी केली उध्वस्त
कुऱ्हा काकोडा (सचिन झनके) गावठी हातभट्टी मुक्ताईनगर पोलिसांनी उध्वस्त केली आहे. धुळे क्षेत्र हद्दीत चार ठिकाणी तसेच कुऱ्हा दूरक्षेत्र येथील गावठी हातभट्टी उध्वस्त केली आहे.
पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे व राहुल बोरकर तसेच पोलीस अमलदार हेडकॉन्स्टेबल गणेश मनोरे, संतोष चौधरी, पोलीस नाईक विजय पठार, संदीप खंडारे, पोलीस अमलदार रवींद्र धनगर, अनिल देवरे, राहुल भिडेवाल, राहुल महाजन, रवींद्र चौधरी पाटील, अंतुरली धुळे क्षेत्र हद्दीत चार ठिकाणी प्रोहिबिशन गुन्ह्या रेड करून सुमारे 174750 रुपयाच्या किमतीचा 4800 गोड गोड नवसागर मिश्र कच्चे रसायन 155 लिटर गव्हाची तयार दारू व वन लिटर उकळते रसायन तसेच सट्टा जुगार 2 केस मध्ये 1125 रोख रुपये सट्टा जुगाराचे साधने तसेच कुऱ्हा दूरक्षेत्र येथे पोलीस निरीक्षक परविन तडवी, सहाय्यक फौजदार संदीप पटवे, पोलीस अमलदार सागर गोपीचंद सोनवणे यांनी सुमारे 11500 रुपये किमतीचा 200 लिटर कच्चे-पक्के रसायन व दहा लिटर तयार दारू रमाने तसेच चांगदेव भेट देत मानेगाव गावी हेडकॉन्स्टेबल अशोक जाधव, पोलीस अंमलदार माधव गोरे वार यांनी 1000 रुपये वीस लिटर तयार दारू सह 6 प्रोहिबिशन व 2 सट्टा जुगाराच्या केसेस करण्यात आले आहे.