महाराष्ट्र
भव्य आरोग्य शिबीर जलंब येथे संपन्न
खामगाव (राजेंद्र मुंडे) निलेश देशमुख मित्र परिवार यांच्या वतीने भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सर्व ग्रामीण भागात गरीब व गरजु लोकांना या योजनेचा लाभ देऊ असे निलेश देशमुख यांनी सांगितले.

यावेळी जलंब गावातील गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने शिबीराचा लाभ घेतला. तपासणी करून औषध वाटप करण्यात आले. यावेळी डॉ शंखपाल व त्याची संपुर्ण टिम उपस्थित होती. यावेळी जलंब गावातील सरपंच ग्रामपंचायत व विशाल मंडवाले मित्र परिवार यांनी सहकार्य करुन सर्व डॉक्टरांचा सत्कार केला. यावेळी उत्तम घोपे, विशाल मंडवाले, रोहित रोटे, साहिल देशमुख, प्रतिक रोटे, वैभव महाले, अक्षय सोनटक्के, व मोठ्या संख्येने निलेश देशमुख मित्र परिवार उपस्थित होता.



