वैजापूर तालुका पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी , गांधी प्रेमींकडून कौतुक
अवैध पद्धतीने दारू विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले

वैजापूर : गहिनीनाथ वाघ (विशेष प्रतिनिधी) आज दिनांक 02/10/2023 रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त ड्राय डे असल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील व पोलीस अंमलदार रणजीत चव्हाण असे लासुरगाव बीट हद्दीत अवैद्य धंद्याविरुद्ध कारवाई करणे कामी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील यांना त्यांच्या गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी मौजे धोंदलगाव खळवाडी नाल्याच्या पुलाजवळ, धोंदलगाव तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे राहुल रामचंद्र जाधव, वय 29 वर्ष, व्यवसाय हॉटेल राहुल रेस्टॉरंट चा मालक, राहणार शिवुर बंगला, संभाजीनगर रोड, तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा त्याचे ताब्यातील टीव्हीएस स्टार सिटी मोटर सायकल क्रमांक MH 20 FT 7547 वर देशी दारू भिंगरी संत्राचे दोन बॉक्स व विदेशी दारू असलेले दोन बॉक्स असे गोणी मध्ये घेऊन जात असतांना मिळून आल्याने पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी त्याचे ताब्यातून 26,250/- रुपये किमतीचा प्रोव्हिबीशन गुन्ह्याचा माल व 50,000/- रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 76,250/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
सदरची कामगिरी ही छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक मनीष कालवानिया,अपर पोलीस अधीक्षक कृष्णा लांजेवार,अप्पर पोलीस अधीक्षक महक स्वामी मॅडम, व पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील व पोलीस अंमलदार रणजीत चव्हाण यांनी केली. सदर कामगिरी मुळे जिल्हातील गांधी अनुयायी व गांधी प्रेमींनी वैजापूर तालुका पोलिसांचे कौतुक केले असून मात्र अवैध पद्धतीने दारू विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.