जैताणे येथील नवीन ग्रामपालिका कार्यालयाचे भूमिपूजन व गावंतर्गत विविध विकास कामांचे लोकार्पण आ. मंजुळा गावीत यांच्या हस्ते संपन्न
जैताणे (प्रतिनिधी) आज जैताणे ग्रामपालिकेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आ. मंजुळा गावित यांच्या हस्ते व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. तसेच जैताणे गावांतर्गत स्थानिक आमदार विकास निधीतून वीस लक्ष रुपयांच्या भूमिगत काँक्रीट पाईप गटारीचे लोकार्पण देखील आमदारांच्या हस्ते झाले व जैताणे गावातील एकलव्य वस्तीत नवीन बोरवेलचे उद्घाटन आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते झाले. तसेच गावातील विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी साक्री तालुका विधानसभा मतदार संघाच्या आमदार मंजुळा तुळशीराम गावित, धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख डॉ. तुळशीराम गावित, साक्री तालुका पंचायत समिती सदस्य सोनाली बाजीराव पगारे, जैताणे ग्रामपालिकेच्या सरपंच कविता अशोक मुजगे, उपसरपंच कविता राकेश शेवाळे, पं स मा सदस्य अशोक तात्या मूजगे, ग्रामपालिका सदस्य तथा गटनेते बाजीराव बुवाजी पगारे, दुसाने गणाचे प.स सदस्यरविंद्र प्रतापराव खैरनार, वासखेडी गणाचे सदस्य ईश्वर ठाकरे, साक्री पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे टी सूर्यवंशी, बांधकाम विभागाचे प्रमुख रावसाहेब साबळे, जैताणे ग्रामपालिकेचे उपसरपंच नानाभाऊ पगारे, भगवान भलकारे, ईश्वर पेंढारे, पोपटराव न्याहाळदे, आन्ना न्याहाळदे, शिवसेनेचे नेते प्रकाश नाना पाटील, सरपंच संजय खैरनार, निजामपूर गणाचे माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे, शिवसेनेचे नेते भुपेश शहा, निजापुर गांवाचे युवा नेते यूसुफ सैय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामस्वराज्य अभियानअंतर्गत वीस लक्ष रुपयांचा निधी नवीन ग्रामपालिका इमारतसाठी वीस लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून या कामाचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते झाले. जैताणे गावातील ग्राम पालिकेची इमारत ही अतिशय जीर्ण व जुन्या काळातील होती म्हणून साक्री तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींना ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत निधी मिळवून देण्याचे काम आमदार मंजुळा गावित यांनी केले. त्यात जैताणे गावाचा समावेश झाल्याने ग्रामस्थांनी आमदार यांचे अभिनंदन करताना आभार व्यक्त केले.
स्थानिक आमदार विकास निधीतून जैताणे गावातील अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भूमिगत गटार हा प्रश्न मार्गी लागण्यात मोठे सहकार्य आमदारांचे जैताणे गावाला मिळाले. आदर्श विंद्या मंदिराच्या पाठीमागून ते अमरधाम पर्यंत एक गटार व बिरोबा महाराज मंदिरापासून, ग्रामपंचायत चौक, बाजारपेठ, साखर झिरा जैताणे पर्यंत दुसरी सर्वात मोठी काँक्रीट पाईप भूमिगत गटारीचे काम पूर्ण झाले. त्याकामात साक्री तालुका विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार मंजुळा गावित यांनी वीस लक्ष रुपयांचा निधी दिल्याने कामाला मोठ्या प्रमाणावर हातभार लागला. मोठी मदत मिळाली म्हणून आज त्यांच्या हस्ते या भूमिगत गटारीचे लोकार्पण कार्यक्रम करण्यात आला.
जैताणे गावात सुरू असलेल्या प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या १०० घराच्या वसाहतीला आज आमदारांनी व सर्व अधिकाऱ्यांची भेट देत कामाची पाहणी केली. लाभार्थ्यांना सोबत चर्चा केली व चांगले काम झाल्याबद्दल ग्रामपालिकेचे कौतुक केले. आखाडे रोड लागत एकलव्य वस्तीत नवीन बोरवेलचे उद्घाटन केले व आदिवासी वस्तीतील पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत मिळाली. त्याबद्दल ग्राम पालिकेचे पदाधिकाऱ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
रोजगार हमी योजनेअंतर्गत जैताणे गावासाठी लवकरच ५० लक्ष रुपयांचा निधी मिळवून गावांतर्गत रस्ते देण्याचे आश्वासन आज आमदारांनी सांगितले. तसेच जैताणे गावासाठी जीवनदायिनी असलेली बुराई पाणीपुरवठा योजना ही मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून येणाऱ्या महिनाभराच्या काळातच योजनेला मंजुरी मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आपण विनंती करणार असून लवकरच योजना गावात कार्यान्वित होईल अशी माहिती आज ग्रामस्थांना दिली तसेच नवीन पाणी शुद्धीकरण केंद्र फिल्टर पाणी दहा लक्ष रुपयाचे देण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी जैताणे गावातील जेष्ठ पदाधिकारी, पत्रकार, ग्रामस्थ व ग्रामपालिकेचे सदस्य गणेश न्याहळदे तनुजा जाधव, रमन चौधरी, लहुजी बोरसे, राजेश बागुल, सत्तार मणियार, गोकुळ पाटील, गोकुळ पगारे, शाम भलकारे, शांताराम मोरे, हिम्मत मोरे, समाधान महाले, ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड, वरिष्ठ लिपिक यादव भदाणे, कनिष्ठ लिपिक योगेश बोरसे, संगणक परिचालक प्रदीप भदाणे, अनिल बागूल आदी कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.