महाराष्ट्रराजकीय

सिल्लोड येथे स्व. बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

सिल्लोड (विवेक महाजन) सिल्लोड येथे शिवसेना युवासेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.

महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सेना भवन येथे युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते स्व. बाळासाहेब ठाकरे तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, युवासेना जिल्हाप्रमुख कैलास जाधव, पंचायत समितीचे सभापती डॉ. संजय जामकर, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख दीपाली भवर, शहरप्रमुख मेघा शाह, वर्षा पारखे, राजेंद्र बन्सोड, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे,सुधाकर पाटील, प्रशांत क्षीरसागर, नॅशनल सुत गिरणीचे संचालक मारुती वराडे, डॉ. दत्ता भवर, संजय मुरकुटे, युवासेनेचे शेख इम्रान ( गुड्डू ) , शिवा टोम्पे , अक्षय मगर, रवी रासने, प्रवीण शिंदे, प्रवीण मिरकर, आशिष कुलकर्णी, संतोष धाडगे, सचिन पाखरे, पालोद सरपंच नासेर पठाण, उपसरपंच मॅचिंद्र पालोदकर, रमेश पालोदकर, योगेश शिंदे, वैभव बन्सोड, त्र्यम्बक गाढवे, कैलास इंगे, सुभाष वडगावकर, विजय खाजेकर, सुनील लांडगे, आनंद सिरसाट, एकनाथ शिंदे, महेश पाटील, गोरख अक्कलकर, केशव गुंजाळ आदी शिवसेना – युवासेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे