राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची लसीकरण केंद्रास भेट
प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी - राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे अवाहन
सिल्लोड ( विवेक महाजन : प्रतिनिधी ) दि.29, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी कोणीही कोरोना प्रतिबंधक लसी पासून वंचित न राहता प्रत्येकाने कोरोना लस घ्यावी तसेच ज्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला असेल त्यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे दुसरा डोस घेऊन 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
रविवार ( दि.28 ) रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शहरातील उपजिल्हा रुग्णालय व इतर ठिकाणच्या लसीकरणास भेट देऊन लसीकरण बाबद आढावा घेतला. याप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नागरिकांना कोरोना लस घेण्याचे अवाहन केले.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित देसाई, वैदयकीय अधिकारी डॉ. मोरे, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, नगरसेवक शेख सलीम हुसेन, विठ्ठल सपकाळ, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हाजी मोहंमद हनिफ, पालोद सरपंच निसार पठाण, उपसरपंच मॅचिंद्र पालोदकर यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.