महाराष्ट्र

साक्री तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांकडून संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना किराणा किटचे वाटप

साक्री (सतीश पेंढारकर) साक्री राज्य परिवहन मंडळातील कर्मचारी गेल्या अडीच महिन्यांपासून संपावर आहेत. या कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती खराब झाली असल्याने प्रापंचिक विवंचनेत आहेत. या पार्श्वभूमीवर साक्री व कासारे येथील विविध सामाजिक संघटनांतर्फे ३० कर्मचाऱ्यांना अल्पशी मदत म्हणून किराणा किट देण्यात आले.


संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. संप सुरू असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन बंद आहे. त्यांच्यासमोर कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर  विविध सामाजिक संघटनांचे सुरेश सोनराज पारख, बाळकृष्ण दगाजी तोरवणे, बी.एम.भामरे, डाॅ.दिलीप चोरडीया, पी.झेड.कुवर, सुहास सोनवणे, पी.बी.गांगुर्डे, विलास गुलाबराव देसले, संदिप देवरे, अमर पेंटर, सौ.जोशिला पगारीया, प्राचार्य बी. एस.पाटील, डाॅ.रामचंद्र शांताराम देसले, अनिल वसंतराव अहिरे, प्रा.अजय नांद्रे, डाॅ.दिलीप लोखंडे, डाॅ.सचिन नांद्रे, प्राचार्य डाॅ.राजेंद्र अहिरे, पंकज भामरे, ए.पी.दशपूते, विजय पारख, मनोज पारख यांच्या आर्थिक सहकार्याने साक्री येथील बसस्थानक परिसरात ३० एस.टी. कर्मचाऱ्यां किराणामालाचे किट देण्यात आले.

गेल्या ७४ दिवसांहून अधिक कालावधीपासून संप सुरू आहे. या संपामुळे सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. त्याचबरोबर एस.टी.कर्मचाऱ्यांच्या संपाकडेही सरकारने दुर्लक्ष केले आहे त्यामुळे एस.टी.कामगार प्रापंचीक उपासमारीत होरपळतो आहे. त्यांना पाठबळ मिळावे या उद्देशाने विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एक माणुसकी म्हणून या कामगारांना पाठबळ दिले आहे.

या प्रसंगी सुरेश पारख, काॅ.सुभाष काकुस्ते, प्रा.एल.जी. सोनवणे, बाळकृष्ण तोरवणे, बी.एम.भामरे, डाॅ. दिलीप चोरडीया, पी.झेड.कुवर, सुहास सोनवणे, पी.बी.गांगुर्डे, विलास देसले, सौ.जोशिला पगारीया, पंकज भामरे, दिपक नांद्रे, कामगार संघटनेचे अशोक देवरे, फरिद पठाण, शरद खैरनार, प्रमोद पाटील, सचिन गाडे आदी उपस्थित होते. काॅ.सुभाष काकुस्ते, सुरेश पारख यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी एस.टी.कर्मचारी सचिन गाडे यांनी संपाची पार्श्वभूमी व कामगारांची समस्या याविषयी विवेचन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक पी.झेड.कुवर यांनी केले तर आभार फरिद पठाण यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे