चोपडा

पंकज कला व विज्ञान महाविद्यालयात जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न

चोपडा (विश्वास वाडे) पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा येथे राज्यशास्त्र विभागाच्यावतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुंन्नुर येथील दुर्घटनेत भारतीय सैन्य दलातील वीरगती प्राप्त झालेल्या सर्व शहिदांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

डॉ. संजय पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार बद्दलची असलेली भूमिका स्पष्ट केली. प्रा.दिपकराव देवरे यांनी मूलभूत अधिकार व कर्तव्य यावर मार्गदर्शन करून सर्वांच्या मूलभूत अधिकारावर बाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना मानवाधिकाराबाबत असलेल्या संविधानिक तरतुदी, कायदे आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.नंदिनी वाघ यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.अजय पाटील यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे