युवा जादूगार चेतनकुमार यांचे जादूचे प्रयोग मुंबई येथे संपन्न
#हेल्पिंग हँड्स वेल्फेअर सोसायटीचा अभिनव उपक्रम
धुळे (प्रतिनिधी) हेल्पिंग हँड्स वेल्फेअर सोसायटीचे मार्गदर्शक समीर चव्हाण यांच्या संकल्पनेतून व्हॅलेंटाईन दिनाच्या पूर्व संध्येला युवा जादूगार चेतनकुमार यांचे अदभूत अविश्वसनीय जादूचे प्रयोग हा कार्यक्रम मु. पोकळ्याची वाडी, पो. साखडबाव, ता. शहापूर, जि.ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी के.वाय.के.एम.फाऊंडेशनचे संस्थापक सहसचिव व सुप्रसिद्ध जादूगार चेतन उपाध्याय यांनी गंगेची घाघर, खाऊचा डबा, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छ भारत, पेपर कॅट करून पुन्हा जादूने तयार करणे इ.विविध जादूचे प्रयोग आणि त्यातून सामाजिक प्रबोधन केले, आपल्या जादूच्या माध्यमातून ग्रामस्थ व लहान मुलांचे मनोरंजनातून प्रबोधन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.वाय.के.एम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहनिष वाडेकर यांनी केले.
यावेळी हेल्पिंग हॅन्डस वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक समीर चव्हाण, अध्यक्ष प्रियंका कांबळे, सचिव रश्मी पाटील, खजिनदार विनायक वाड, स्वयंसेवक – डॉ अनिकेत जंगम, स्वयंसेविका ऋतुजा, सोनल पार्टे, वनिता, उर्मिला पाटील, संगीता वेहळे, आदिती कोहले, गौरवी म्हपुष्कर, पूजा पवार, वैदही कोळी व ग्रामस्थ उपस्थित होते.