चोपडा

शासकीय कर्मचारी जागेची पाहणी करणेबाबत शेतकरी संघर्ष संघटनातर्फे मुख्यकार्यकारी यांना निवेदन !

सनपुले ता. चोपडा (प्रतिनिधी) येथील सनपुले ग्रामपंचायत येथे दलीत वस्तीचे स्ट्रिमीक्सचे काम मंजुर झाले होते. तरी ते काम चालु असताना काम बंद करण्यात आले. रस्त्या अभावी म्हणून दि. २८ जानेवारी २०२२ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शेतकरी संघर्ष संघटना तालुका अध्यक्ष समाधान बाविस्कर व दलीत समाज बांधव व ग्रामपंचायत सदस्य रतीलाल बाविस्कर यांच्या कडुन निवेदन देण्यात आले होते. तरी आज पर्यत शासकीय कर्मचारी या जागेची पाहणी करण्यास आले नाहीत म्हणून आज रोजी परत अस्मरण पत्र मुख्यकार्यकारी यांना देण्यात आले व जिल्हाधिकारी यांना पण हे निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीमध्ये असलेले अधिकाराचा वापर करुन अन्यायविरुध्द अमरण उपोषणास बसतील असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना शेतकरी संघर्ष संघटनाचे चोपडा तालुका अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य रतीलाल बाविस्कर यांच्या सह्या आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे