चोपडा

आज चोपड्यात शिवजन्मोत्सवचा जल्लोश सांस्कृतिक कार्यक्रम व आतिषबाजी

चोपडा (विश्वास वाडे) येथे दि.१९ फेब्रुवारी रोजी साज-या होणाऱ्या शिवजन्मोत्सवा निमित्ताने संपूर्ण चोपडा शहर भगवेमय होत मोठ्या प्रमाणावर सजविण्यास प्रारंभ झाला आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजन्मोत्सवा निमित्ताने मुख्य कार्यक्रम सायंकाळी पाच ते रात्री १० वाजेपर्यंत अत्यंत नियोजनबद्ध विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.त्यासाठी सर्व शिवप्रेमी बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमा दरम्यान सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने माल्यार्पण करण्यात येणार आहे.तसेच छत्रपती महाराज चौकात भव्य सजावट केली जात आहे.शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे पोवाडे दिवसभर वाजविण्यात येवून त्यांच्या विशाल कर्तृत्वाला मानाचा मुजरा केला जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने संपूर्ण शहरात भगवेमय करण्यात येत आहे.शहर भगवे ध्वज,भगव्या पताका,भगवे झालर लावत शहराची सजावट प्रगतीपथावर आहे.तसेच शहरात मोठ्या प्रमाणावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला जनतेसमोर मांडताना गड किल्ल्यांचे आकर्षक होर्डीग जागोजागी लावले जात आहेत.कार्यकर्त्यांच्या शिवजयंती निमित्ताने शुभेच्छांचे शेकडो फलक शहरभर लावले जात आहेत.

नयनरम्य कार्यक्रम

शिवजन्मोत्सवा निमित्ताने दि.१९ रोजी सायंकाळी पाच वाजेपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात समितीच्या वतीने नयनरम्य कार्यक्रम पार पडणार आहे.यावेळी मुलींचे लेझीम पथक आपला आविष्कार सादर करण्यात येणार आहे.तसेच विविध शाळांचे विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.तसेच पथनाट्य व विविध कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर रात्री आठ वाजेपासून नेत्रदिपक आतिषबाजी केली जाणार आहे.या विस्तीर्ण शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमांची माहिती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीने कळविली आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे