गुन्हेगारी

वरणगाव परिसरातील ३ गावामध्ये एकाच रात्री तब्बल अकरा ठिकाणी घरफोडी

परिवार गच्चीवर गाढ झोपल्याची संधी साधून चोरट्यांनी लाखो रुपयाचे ऐवज केले लंपास

भुसावळ (प्रमोद बावस्कर) वरणगाव परिसरातील ३ गावामध्ये एकाच रात्री तब्बल अकरा ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. परिवार गच्चीवर गाढ झोपल्याची संधी साधून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, वरणगाव परिसरातील तळवेल पिंपळगाव बुद्रुक ओझरखेडा येथे एकाच रात्री चोरट्यांनी तब्बल 11ठिकाणी घरफोडी करून लाखो रुपयांचे ऐवज लंपास केले. घरफोडी झालेल्या घरातील कुटुंबांमधील काही बाहेरगाव तर काही घर मालक आपल्या गच्चीवर थंडगार हवेच्या गाढ झोपेत असल्याने चोरट्यांनी संधी साधली. या प्रकरणामुळे गावकऱ्यांमध्ये चांगलीच धांदल उडाली असून सर्वत्र भीतीचे वातावरण झाले आहे. सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी वरणगाव भागात तळवेल या गावात दोन ठिकाणी पिंपळगाव बुद्रुक येथे पाच ठिकाणी वझरखेड येथे ४ जागी चोरट्यांनी घरफोडी केली. यामध्ये लाखो रुपयाचे ऐवज लंपास करण्यात आले. घरफोडी झालेल्या घरातील कुटुंब गच्चीवर गाढ झोपले होते.

घरफोडी घटना सकाळी निदर्शनास आल्याने घरमालकांच्या व गावकऱ्यांच्या मध्ये एकच खळबळ उडाली. पिंपळगाव बुद्रुक येथील राहुल आत्माराम पाटील यांचे 32,000 रु किमतीचे 5 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत व त्यांच्या शेजारचे निर्मलाबाई लक्ष्मण पाटील यांचे सुद्धा घर फुटल्याचे निदर्शनात आले. हे बाहेरगाव असल्याने त्यांना फोन करून बोलवण्यात आले. त्यांच्या घरातील सुद्धा 3५,000 रुपये किमतीची सोन्याची पोत चोरीला गेली व किसन शेनफळ बेडाळे हे पण बाहेर गांवी त्यांच्या व्यवसाय काँट्रांटर असल्याने नागपूर गेले असता संधी साधून चोरटयांनी त्याच्या घरातुन 20,000 रुपये रोख तसेच अनंता सरोदे यांच्या घरातून 10,000 रुपये रोख तर 25,000 रुपये रु दीड तोळे वजनांची सोन्याची पोत तसेच अशोक मधुकर चौधरी यांच्या घरातील 10,000 रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले. ओझरखेड येथील अशोक चावदस नेमाडे गोकुळ तुकाराम नेमाडे व उत्तम पाटील यापैकी नाशिकेत नेमाडे यांच्या घरातुन 2 लाख 55 हजार रुपयाचे रोख रक्कम सह ऐवज लंपास केले तर तळवेल येथेही दोन ठिकाणी घरफोडी झाली.

या घटनेची माहिती वरणगाव पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला गती दिली आहे. तर चोरीच्या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तिन गांवमध्ये एकाच रात्री चोरट्यांनी चोरी केल्याने चोरट्यांचा तपास घेण्यासाठी जळगाव येथील श्‍वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. तर श्‍वान घरफोडी झालेल्या घराजवळ घुटमळल्याने चोरटे ही दुचाकी व चार चाकी वाहनाने आले असावेत असा पोलिसांनी अंदाज वर्तविला असून त्यादृष्टीने पोलिसांचे पथके मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात रवाना करण्यात आली आहेत. तसेच घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांची भेट देऊन पाहणी केली.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार आडसुळ व पोलीस उपनिरीक्षक दळवी यांना तपासाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. पिंपळगाव बुद्रुक येथील आत्माराम पाटील यांनी मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी चाळीस हजार रुपये आणून ठेवले होते तर किसन बेंडाळे यांच्या घरातून चोरट्यांनी काही रक्कम व नव्यानेच आणलेल्या तीन हजार रुपये किमतीचा बूट तसेच ताडपत्री असा ऐवजी चोरून नेला. या सर्व प्रकरणाची संध्याकाळ उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात वरणगाव येथे नोंद करण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे