साक्री तालुका स्टॅम्पवेंडर संघटनेच्या अध्यक्षपदी माधवराव पाटील
साक्री (प्रतिनिधी) साक्री तालुका स्टॅम्पवेंडर व राईटर संघटनेची संस्थापक अध्यक्ष प्रमोद ओझरकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील विश्रामगृहात नुकतीच बैठक होऊन संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी माधवराव आसाराम पाटील तर उपाध्यक्षपदी सादिक रशीद शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
उत्तर महाराष्ट्रातील कामगार कायदा अंतर्गत नोंदणीकृत असलेली ही एकमेव संघटना आहे. कार्याध्यक्षपदी प्रवीण शिंपी, सरचिटणीसपदी संजय सोनवणे, सहसचिवपदी महेंद्र नेरकर, कोषाध्यक्षपदी एके पठाण, कार्यकारणी सदस्यपदी प्रकाश ततार, राजेंद्र बोरसे आदींची तीन वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. यावेळी ज्येष्ठ स्टॅम्पवेंडर बी एम कोळेकर, राजेंद्र भामरे आदी उपस्थित होते. प्रमोद ओझरकर यांनी आभार प्रदर्शन केले. अध्यक्ष माधवराव पाटील व त्यांच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पत्रकार सतीश पेंढारकर, प्रा सुधीर कासार, रमेश महाले, शरद मोरे, नितीन जगदाळे, माजी नगरसेवक जगदीश वाघ, ज्येष्ठ पत्रकार दिलीप मराठे आदींनी मनापासून अभिनंदन केले आहे.