भाजप नेत्यावर झालेल्या धक्कादायक आरोपांची सीबीआय चौकशीची भाजपातर्फे मागणी
चोपडा (विश्वास वाडे) आज रोजी भारतीय जनता पार्टी चोपडा तालुक्याच्या वतीने तहसीलदार (गावित) यांना निवेदन सादर करण्यात आले. कारण भाजपाचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरिष महाजन, माजी मंत्री जयकुमार रावल, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार व राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांना खोटीनाटी प्रकरणे तयार करत मोक्का सारख्या गंभीर प्रकरणात अडकविण्याचे षडयंत्र रचणाऱ्या माजी आमदार अनिल गोटे व विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनातून भाजपा चोपडा तालुक्याच्या वतीने करण्यात आली.
यावेळेस उपस्थित तालुका अध्यक्ष पंकज पाटील, शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल,जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील, भाजपाचे जेष्ठ नेते चंद्रशेखर पाटील, युवा मोर्चा ता अध्यक्ष प्रकाश पाटील, सरचिटणीस चंद्रकांत धनगर, सरचिटणीस हनुमंत महाजन, सरचिटणीस सुनिल सोनगिरे, बेटी बचाओ बेटी पढाओ चे जिल्हा सदस्य लक्ष्मण चौधरी, अनु जमाती जिल्हा उपाध्यक्ष प्रेम घोगरे, युवा मोर्चा ता उपाध्यक्ष विवेक गुजर, सोशल मिडीया जिल्हा सहयोजक मिलिंद वाणी, आर्थिक आघाडी ता अध्यक्ष नितीन राजपुत, युवा मोर्चा ता उपाध्यक्ष रणछोड पाटील, सोशल मिडीया अॅप प्रमुख धर्मदास पाटील, सामाजिक कार्यक्रते डाॅ मनोज सनेर, अल्पसंख्याक ता अध्यक्ष संजय जैन यासह असंख्य क्रार्यक्रते उपस्थित होते.