महाराष्ट्र
येवतीच्या पालकांनी रोड रोमिओला दिला चोप
येवती ता. बोदवड (प्रतिनिधी) येथील विद्यार्थिनी रोज जामठी येथे 2 कि. मी. पायी शाळेत चालत जातात, या दरम्यान बेटावद खु.येथील मुलगा बापू दुमाले हा मुलींना रोज त्रास द्यायचा, विद्यार्थिनींनी शाळेत तक्रार दिली पण तो मुलगा शाळेतील नसल्यामुळे सरांनी व मुलींनी हा प्रकार पालकांना सांगितला. नेहमी प्रमाणे आज ही सकाळी 6.45 तो मुलगा मुलीनं जवळ येताच सर्व पालकांनी सापळा रचून त्याला चोप दिला. व शाळेत हजर करून मुलींनी सुध्दा त्याला जोप दिला, जेणे करून इतरांना सुध्दा चपराक मिळेल, नंतर त्यांला रितसर पोलिसांच्या स्वाधीन केला.