वेडवहाल येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी सोहळा संपन्न
शहापूर (देविदास भोईर) वेडवहाल येथे अखंड हरिनाम व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला. गेली 43 वर्षापासून हा सप्ताह वै. ह भ प गुरुवर्य गोविंद बाबा गोवारी यांच्या कृपा आशीर्वादाने पार पडत आहे.
पंचक्रोशीतील नामवंत महाराज व पंचक्रोशीतील वारकरी भाविक, साथकरी तसेच बालगोपाल, महिला, पुरुष,सेवाजेष्ठ लोक, तरुण वर्ग व किर्तनकार एकत्र येऊन हा सोहळा पार पडला. सर्व ग्रामस्थ ह्या आनंदोत्सवात हिरारीने भाग घेऊन गुण्या गोविंदाने गावात स्वच्छता करून घरासमोर रांगोळीचे सडे व पाना फुलांचे तोरणे बांधुन प्रत्येक घरासमोर दिवे लावून दिवाळी साजरी करतात. स्त्री पुरुष व बालगोपाळ नविन वस्त्र व महिला वर्ग विविध प्रकारची आभुषणे घालून या पालखी सोहळ्याचा आनंद लुटत असतात. दररोज काकडा, पारायण, प्रवचन, हरिपाठ व किर्तन व स्नेहभोजन असे कार्यक्रम पार पडली असून .समाजामध्ये एकोपा निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्व वारकऱ्यांचे उपस्थित हा सोहळा मोठ्या आनंदाने पार पडला.