राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते कोरोना योद्धांचा सन्मान
सिल्लोड (विवेक महाजन) कोरोना संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावणारे आरोग्य कर्मचारी, शासनाच्या विविध विभागाचे कर्मचारी, ग्राम पंचायत व स्वच्छता कर्मचारी, पोलीस , शिक्षक , आशा सेविका, समाजसेवक आदी कोरोना योद्धांना महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र यासोबतच महिला भगिनींना साडी भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
भराडी ता. सिल्लोड येथील जि.प. शाळेच्या प्रांगणात मंगळवार (दि.२५) रोजी हा सोहळा पार पडला. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने पंचायत समितीचे उपसभापती काकासाहेब राकडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कोरोना योद्धांचे योगदान कदापि विसरता येणार नाही. आजही शासकीय सेवेतील कर्मचारी कोरोना विरोधात लढा देत आहे. कोरोना योद्धांनी केलेली सेवा व कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी साथ दिल्यानेच या संकटावर मात करता आली असे स्पष्ट करीत धोका अजून टळेलेला नसून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेवून शासनाच्या नियमांचे पालन करावे असे अवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक सतीश ताठे, पंचायत समितीचे उपसभापती काकासाहेब राकडे, जिनिंग प्रेसिंगचे अनिस पठाण, रमेश साळवे, सरपंच पप्पू जगनाडे, उपसरपंच गजानन महाजन, पोलीस पाटील सौ. यमुनाबाई राकडे, युवासेनेचे प्रवीण मिरकर, संग्राम राजपूत, वांगी येथील बापूराव काकडे, दत्ता सोनवने आदींची उपस्थिती होती.