अर्ध्यावरती संसाराचा डाव सोडून जाणाऱ्यांना भारतीय स्टेट बँक शाखा ढाणकी ठरते आधारवड.
ढाणकी: दि.०७जुलै२०२२(प्रतिनिधी): भारतीय स्टेट बँकेच्या प्रत्येक ग्राहकाला विमा सुरक्षा कवच प्रदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते दरवर्षीच जीवन ज्योती विमा, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ,एसबीआय जनरल इन्शुरन्स ,यासारख्या इन्शुरन्स पॉलिसी ची माहिती इथल्या कर्मचाऱ्याकडून देण्यात येते मग तो भारतीय स्टेट बँक चे ग्राहक असावे लागतो. प्रत्येकालाच या योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने ही योजना अनेक वर्षापासून राबवण्यात येते, आपल्या ग्राहकांना सुरक्षा कवच मिळावे म्हणून जनधन चे खाते जरी असले तरी पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत वर्षाला १२ रुपये याप्रमाणे एक लाखाची त्यांना सुरक्षा कवच दिले जाते जीवन ज्योती विमा अंतर्गत ३३० रुपयासाठी वार्षिक ईएमआय देण्यात येते दोन लाखाचे सुरक्षा कवच देण्यात येते.एसबिआय जनरल इन्शुरन्स शंभर रुपयाला दोन लाख रुपये, दोनशे रुपयाला चार लाख रुपये ,पाचशे रुपये चे दहा लाख रुपये सुरक्षा कवच देण्यात येते.
दि.६ जुलै २०२२ ला भारतीय स्टेट बँक शाखा ढाणकी ग्राहक असलेल्या परमेश्वर तातेराव गव्हाळे यांचे नुकतेच आकस्मित निधन झालेत वयाच्या तिसाव्या वर्षीच त्यांच्या कुटुंबाला आधारवड कोसळला सामान्य शेतकरी कुटुंबात कुटुंबातील परमेश्वर यांच्या जाण्याने गवळी कुटुंबाची संसाराची घडीच विस्कटली करता पुरुष गेल्याकारणाने कुटुंबावर मोठी संकट येऊन कोसळले. ज्या संकटावर मात व्हावी यासाठी भारतीय स्टेट बँक चा आणखी ज्या जीवन ज्योती विमा योजना आधारवर ठरली. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी गव्हाळे कुटुंबाच्या नावाने पॉलिसी असल्याचे त्यांना कळवले कर्मचाऱ्यांनी व परमेश्वर याची पत्नी संगीता गव्हाळे राहणार निंगणुर याबद्दलची माहिती दिली जीवन ज्योती विमा अंतर्गत ३३० रुपये त्याचा वार्षिक हप्ता बँकेच्या खात्यातून कपात करण्यात आला होता. त्यामुळे या योजनेचा लाभ संगीता परमेश्वर गव्हाळे रा.निंगणुर याना दोन लाख रुपये धनादेश देण्यात आला. या निमित्त घेण्यात आलेल्या छोट्या खाणी कार्यक्रम भारतीय स्टेट बँक शाखा येथे घेण्यात आला. यावेळेला शाखाधिकारी अतुल अरुण देशपांडे यांच्या हस्ते संगीता परमेश्वर गव्हाळे यांना हा धनादेश देण्यात आला. या वेळेला ढाणकी येथील बाळू पाटील चंद्र सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, दत्त दिगंबर वानखेडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेख माजिद शेख पाशा तालुका अध्यक्ष प्रहार, रुपेश भंडारी तालुका व्यापारी अध्यक्ष, अमोल तुपेकर गोल्ड व्हॅलीवर, उमेश योगावार नगरपंचायत सदस्य, पंकज केशेवाड नगरपंचायत सदस्य, सुभाष गायकवाड, मंगेश चौरे, बँकेचे पूर्ण कर्मचारी नितीन धामणकर, मयूर ठोकळ ,संघरत्न थोरात ,सचिन पराते, संतोष जोशी संदीप फुलेवाड हे उपस्थित होते.
भारतीय स्टेट बँकेच्या प्रत्येक ग्राहकांनी बँकेत सुरू असलेल्या विविध योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती शाखाधिकारी अतुल अरुण देशपांडे यांनी केली जीवन ज्योति विमा प्रधान सुरक्षा विमा, एसबीआय जनरल इन्शुरन्स, यासारख्या योजनेचा लाभ घेतल्यास गरीब कुटुंबांना मात्र मोठा आधाराने दिलासा मिळेल अशी मत त्यांनी व्यक्त केले.