महाराष्ट्र
कु. भावना चंद्रकांत पवार हिला गणितात उमविचे सुवर्णपदक
धुळे (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने२०२०-२०२१या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली. त्यात धुळे येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कै. कर्मवीर डॉ पां. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. भावना चंद्रकांत पवार ही विद्यार्थिनी एम. एस्सी. गणित विषयात विद्यापठात सर्वंप्रथम आली असून ती गणितातील प्रतिष्ठित अशा सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. तिला महाविद्यालयातील गणिताच्या सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. पाटील, सहकारी प्राध्यापक आणि कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. तिच्या यशाबद्दल संस्थेचे आधारस्तंभ दाजीसाहेब रोहिदास पाटील, चेअरमन आणि धुळे ग्रामीणचे आमदार बाबासाहेब श्री. कुणालजी पाटील यांनी कौतुक केले.