महाराष्ट्र
शिव विचाराने प्रेरीत होऊन ग्रामस्थांनी सालाबादप्रमाणे शिवजयंती केली साजरी
वासिंद (सचिन शेलवले) शिवप्रेमी मित्र मंडळ व गुरु माऊली हरिपाठ मंडळ, राजे संभाजी नगर शास्त्री कॉलनी, गेरसे रोड वासिंद पूर्व या ठिकाणी समस्त शिवप्रेमींच्या उच्च ध्येयाने व शिव विचाराने प्रेरीत होऊन ग्रामस्थांनी सालाबादप्रमाणे यावर्षीही तिथीप्रमाणे नुकतीच शिवजयंती साजरी झाली.
या कार्यक्रमात सर्व शिवप्रेमी बंधू भगिनी, बाळ गोपाळ अबाल वृद्धांची उपस्थिती प्रार्थनीय होती. कार्यक्रमाची रूपरेषा- प्रथम काकडा आरती, शिव प्रतिमा पुजन, महिला मंडळ हळदी कुंकु, शिव विचार मंथनावर स्वरांगिनी वलासेसच्या विद्यार्थ्यांनी शिव चरित्रावर आधारीत शिवगीते तसेच इतर मुलांची गाणी त्यानंतर संध्याकाळी भजन, शिव पालखी सोहळा त्यानंतर ७ ते ९ ह .भ .प . विश्वनाथ महाराज वारिंगे यांचे सुश्राव्य किर्तन व त्यानंतर महाप्रसाद झाला. या सोहळ्याचा सर्वांनी लाभ घेतला.