अंबापूर येथे श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन
शहादा (प्रतिनिधी) श्री साईबाबा भक्त मंडळ संचालित, कला वरिष्ठ महाविद्यालय म्हसावद ता.शहादा येथील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने अंबापूर येथे श्रमसंस्कार शिबिराचे 22 ते 28 मार्च या कालावधीत आयोजन करण्यात येत आहे.
या वर्षी भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे त्यानिमित्ताने सर्व स्वातंत्र्यवीरांना मानवंदना करण्यासाठी भारतीय स्वातंत्र्यावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. म्हणून या वेळी उद्घाटक माजी सैनिक भाईदास आत्या वळवी हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन विठ्ठल हिरजी चौधरी होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष धारुभाई सदाशिव पाटील, सचिव गणेश नरोत्तम पाटील, तसेच संस्थेचे संचालक मंडळ, अंबापूर गावाचे सरपंच बायसीबाई अजित पवार, उपसरपंच दिलीप नारसिंग पवार, पोलीसपाटील सुरेश गुलाबसिंग आहेर, ग्रामसेवक रवी रावनकर अंबापूरचे जेष्ठ नागरिक उपस्थित राहतील.
सात दिवशीय श्रमसंस्कार निवासी शिबिरात गावात कोरोना मुक्त भारत, कोरोना लसीकरण नागरिकांचा सहभाग वाढवा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, जैव विविधता व पर्यावरण, राष्ट्रीय सेवा योजना एक राष्ट्र शक्ती, ग्रामीण विकास व विद्यार्थी शिक्षणाचे भारतीयकरण इत्यादी विषयांवर मान्यवरांचे व्याख्यान बौद्धिक सत्रात आयोजित करण्यात येणार आहे. त्यासोबतच बेटी बचाओ बेटी पढाओ,अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संरक्षण, विविध विषयावर गावात जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन, मानवी हक्क कायदा आणि सुरक्षा जागतिक मंदी व बेरोजगारी, महिला सक्षमीकरण यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या व्याख्यान व मार्गदर्शन लाभणार आहे. शिबिराचे व्यवस्थापन प्राचार्य मनोज पाटील, एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. अशोक गिरासे, प्रा सहा. कार्यक्रम अधिकारी, संगीता पटेल अर्थशास्त्र विभागाचे प्रा.श्रीराम बनसोडे, सहा.प्रा. ज्ञानेश्वर गवळे, शिक्षकेतर कर्मचारी हेमराज पाटील, अविनाश चौधरी, जितेंद्र पाडवी निवासी शिबिर यशस्वी साठी कार्यरत आहेत.
उद्घाटन कार्यक्रमाबद्दल संस्थेचे चेअरमन विठ्ठल हिरजी चौधरी, संस्थेचे उपाध्यक्ष धारुभाई सदाशिव पाटील, सचिव गणेश नरोत्तम पाटील, अंबापूर गावाचे सरपंच बायसीबाई अजित पवार, उपसरपंच दिलीप नारसिंग पवार, पोलीसपाटील सुरेश गुलाबसिंग आहेर, ग्रामसेवक रवी रायनकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.