सिल्लोड येथे जम्मा जागरण उत्साहात ; बाबा रामदेव यांच्या सुमधुर भजनाने भाविक मंत्रमुग्ध
सिल्लोड : समस्त मारवाडी समाजबांधवांचे आराध्य दैवत असलेल्या रुणेचा धाम रामदेवजी बाबांचा जम्मा (भजन) जागरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. हैद्राबाद येथील प्रसिद्ध संगीतकार व गायक सुशील बजाज यांच्या सुमधूर भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने बहार आणली. या कार्यक्रमात दिवंगत प्रसिद्ध गायक गोपाल बजाज यांच्या ‘ खम्मा-खम्मा हो रामा रूनिचे रा धनिया ‘ सारख्या भजनांनी लक्ष वेधले. आरती, पूजाविधी आणि भजनाच्या कार्यक्रमात अबालवृद्ध दंग झाल्याचे यावेळी दिसून आले.
कार्यक्रमास महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह मलमसरे येथील प.पु. रामदेव शर्मा, भुसावळ येथील गोपाल प्रजापती, जालना येथील श्रीमती प्रियाताई , वालसावंगी येथील श्रीमती शांताबाई कोठारी यांची प्रमुख उपस्थिती होती. मंगळवार ( दि.16 ) रोजी शहरातील श्रीनिवास लॉन्स येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. सिल्लोड येथील द्वारकाधिश बाबा रामदेवजी भक्त मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. करण्यात आले होते.
येत्या मे महिण्यात सोयगाव येथे होणार भव्य जम्मा जागरण – राज्यमंत्री अब्दुल सत्तार
यावेळी सकल मारवाडी समाजबांधवांच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. सिल्लोड येथे बऱ्याच वर्षानंतर जम्मा जागरण होत आहे. त्यातच दोन वर्ष कोरोना संकटात गेले. सिल्लोड – सोयगाव तालुक्यात बाबा रामदेव यांचा मोठा भक्तगन असल्याने येत्या मे महिन्यात मित्र मंडळाच्या वतीने सोयगाव येथे भव्य जम्मा जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल अशी घोषणा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी केली. व्यासपीठावर उपस्थित प्रसिद्ध गायक सुशील बजाज यांनी 15 ते 20 मे दरम्यान जम्मा जागरण साठी तारीख द्यावी असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
सिल्लोड येथील व्यापारी श्री मोहनलालजी भंसाली , घनश्याम वर्मा, शिवेश खंडेलवाल, वैभव दरगड आदींनी सुयोग्य नियोजन करून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमास व्यापारी गोविंद सेट तायल, सुभाष सेट जैन, रमेश कासलीवाल, सुदर्शन अग्रवाल, भिकचंद कर्णावट, विनोद मंडलेचा, राजुसेठ खिवंसरा, अनिल बोरा, आत्माराम अग्रवाल,दत्तात्रय बावस्कर, रणछोडदास होलानी, राधेश्याम गट्टानी, हेमंत बाफना, रमेश लाठी, राजुसेट कटारिया ,राम वर्मा, डॉ अभय शर्मा आदींसह शहर व परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.