धारणी तालुका भाजपाच्या वतीने 42वा स्थापना दिवस जल्लोषाने साजरा
अमरावती (महेंद्रसिंग पवार) संपूर्ण भारतात भाजपाचा 42 वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या अनुषंगाने धारणी भाजपाच्या वतीने मोठ्या हर्षो-उल्हासात कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, प्रमुख अतिथी भाजपा तालुका अध्यक्ष हिरालाल मावस्कर तथा ज्येष्ठ भाजपा नेते सुभाष गुप्ता, रामदासजी नालमवार, माजी आमदार पटल्या गुरुजी, माजी आयुक्त रमेश मावस्कर, सदाशिव खडके, माजी तालुका अध्यक्ष अप्पा पाटील यांनी कार्यक्रमाला संबोधित केले. सदर सभेला संबोधित करतांना माजी आमदार प्रभूदास भिलावेकर यांनी राष्ट्रवाद, हिंदुत्ववाद, सबका साथ सबका विकास याच्यावर आपले अमुल्य मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात भाजपा ओबीसी मोर्चा सदस्य गोपाल राठोड, नगरसेविका संगीता खार्वे, भाजपा महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षा क्षमाताई चौकसे, चंद्रशेखरजी खार्वे, भटक्या जमाती ता. अध्यक्ष धोंडीबा मुंडे, किसान आघाडीचे तालुका अध्यक्ष सुभाष सालफडे, सुधाकरजी फकडे, श्याम गंगराडे, धारणी शहर अध्यक्ष सुशिलभाई गुप्ता, तिलक पटेल, भाजपा तालुका उपाध्यक्ष मारोती गायन, मानिषकुमार पांडेय, तुलसिराम बेठेकर, भाजपा अनुसूचीत जमातीचे अध्यक्ष लक्ष्मण जांबेकर, अनुसूचीत जातीचे ता. अध्यक्ष अँड. संतोष कलमेकर, तथा शेकडो भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन तालुका महासचिव सुनिल लखपती यांनी केले असून आभार प्रदर्शन सुंदर पोटेकर यांनी केले.