वैजापूर शासन व प्रशासन भ्रष्टाचाराला पाठीशी घालताय ; डोणगाव येथे प्रकाश डोखे आमरण उपोषणाला बसणार
वैजापूर : वैजापूर शासन व प्रशासन भ्रष्टाचाराला पाठीशी घालत असल्याकारणाने आमरण उपोषण किंवा वेळ आल्यास जलसमाधी घेणार असल्याचे प्रकाश डोखे म्हणाले. तसेच निवेदन देऊन स्पष्ट केले.

डोणगाव दिनांक 4 ते 7 ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये रुपये 14 लाख 63 हजार 745 रकमेचा शासनाच्या तिजोरीतून बेहिशोबी वाटप केल्याबद्दल डोणगाव गोरख शिवनाथ डोखे गट नंबर 166 उतार याप्रमाणे 0.57 आर क्षेत्र असताना 0.80 दाखवले. 0.40 शेती नुकसान 0.40 आर मका दाखवण्यात आली. गट नंबर 49 एकनाथ नाना अल्पशिक्षित असताना इंग्रजीत बनावट सही केली. गट नंबर 17 पंचनामा करत असताना पंच नंबर चार निरीक्षक असताना इंग्रजी बनावट सही केली. पंच नंबर पाच 2014 ला मयत असताना 16-8-2019 रोजी त्याची इंग्रजीत सही केली. गट नंबर 115, 116, 126 नदीपासून अंदाजे आठ किलोमीटर असताना पूररेषेत नसताना पंचनामा करून मदत देण्याचा प्रयत्न केला तसेच खातेदारांनी मदत लुटण्याचा प्रयत्न केला. ठरावीक पंचांनी वारंवार सह्या घेऊन खोटे कागदपत्रे तयार केली ते खरे दाखवून गोदावरी नदीचा पूरग्रस्त निधी हडप केला. फसवणूक केली. त्यांच्यावरती 420 467 468 471 120 प्रमाणे गुन्हा केला असे असताना चौकशी अधिकारी तत्कालीन नायब तहसीलदार दिपाली खेडेकर व तहसीलदार राहुल गायकवाड यांनी आरोपीला गुन्ह्यातून वाचवण्यास मदत केली. याबाबत वेळोवेळी सरकारी दप्तरी तक्रारी नोंद असताना दखल घेतील जात नाही. वरिष्ठांचा आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली. तसेच डोणगाव ग्रामपंचायत गावठाणात बागाईत शेती करीत असलेले गोरख शिवनाथ डोखे याबाबत गट विकास अधिकारी उपविभागीय अधिकारी वैजापूर तहसील वैजापूर यांना वेळोवेळी तक्रार केली असता ग्रामसेवक संजय जयसिंग राठोड डोणगाव यांनी गट विकास अधिकारी वैजापूर यांना खोटा व दिशाभूल करणारा खुलासा सादर केला. त्यांना गावठाणात अतिक्रमण नसून कळविण्यात आले असे प्रकाश डोखे यांनी स्पष्ट केले व पुरावे असून सुद्धा न्याय मिळत नसल्याकारणाने मी प्रकाश डोखे 14 एप्रिल रोजी डोणगाव येथे अमरण उपोषण किंवा वेळ आल्यास जलसमाधी घेणार असे निवेदन देऊन स्पष्ट केले व मला काही झाल्यास याला जबाबदार वैजापूर शासन राहील.



