बोरद विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध
बोरद (योगेश गोसावी) बोरद विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक लागल्याने आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १३ जागांसाठी १३ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने निवडणूक न होता बिनविरोध झाल्याचे सोसायटीचे सचिव जयपालसिंह राजपूत व लिपिक गोविंद पाटील यांनी सांगितले.
१९५९ झाली बोरद विविध कार्यकारी सोसायटी ची स्थापना झाली.आज तागायत सोसायटीची निवडणूक बिनविरोध होत होती परंतु या वर्षी निवडणूक होईल असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र दत्तात्रय पाटील यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन सामंजस्याने सर्व जुने उमेदवार वगळून नवीन उमेदवार घेण्याचे एकमताने ठरवण्यात आले. निवडणूक बिनविरोध साठी माजी चेअरमन कृष्णदास पाटील, सोमनाथ सुपडू पाटील, सोमनाथ पुना पाटील, दत्तात्रय पाटील इप्तीहार तेली, रतिलाल पाटील, किशोरसिंग राजपूत,पुंडलिक पाटील, चुनीलाल पाटील यांनी परिश्रम घेतले. व सर्व तरुण उमेदवारांना याठिकाणी संधी देण्यात आली. त्यात १३ जागा साठी १३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
त्यात सर्वसाधारण मतदार संघात एकूण उमेदवार १) चौधरी गणेश सोमनाथ २)जितेंद्र रघुनाथ पाटील ३) अनिल प्रेमसिंग राजपूत ४)भीमसेन गोरखसिंग राजपूत ५)सुनील मथुर पाटील६) प्रल्हाद चिमण पाटील ७)इप्तीहार तेली ८)जगदीश विश्वनाथ चौधरी तर इतर मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून १)योगेश मधुकर पाटील अनुसूचित जाती जमाती एस.टी. ठाकरे देविदास बुधा, महिला प्रतिनिधी सुभद्रा गोविंद पाटील २) सरोजबाई चुनीलाल पाटील, अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी मनीलाल दुल्लभ ढोडरे. असे एकूण १३ जागेसाठी १३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तसेच सोसायटीचे सचिव जयपाल सिंग राजपूत व गोविंद पाटील यांनी सांगितले.ठीक दुपारी १ वाजता सोसायटीच्या कार्यालयात उमेदवार व अनुमोदक, सूचक उपस्थित राहून अर्ज भरले. यावेळी दत्तात्रय पाटील, जुल्फिकार तेली,जलीस तेली,विजय राणा, चुनीलाल पाटील ,पुंडलिक पाटील, सुनील पाटील, मंगेश पाटील, जितेंद्र पाटील .इत्यादी असंख्य सभासद उपस्थित होते बिनविरोध झाल्याने ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले.