केयूर शरद मोरे जपानी भाषा परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
साक्री (प्रतिनिधी) येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मधील इयत्ता सहावीतील विद्यार्थी केयूर शरद मोरे याने जपानी भाषा परीक्षेत प्रथम प्रयत्नात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊ विशेष यश प्राप्त केले आहे. फॉरेन लँग्वेजमध्ये अशा प्रकारचे यश प्राप्त करणारा तो सर्वात लहान वयाचा विद्यार्थी आहे.
साक्री येथील माजी पंचायत समिती सदस्य सामाजिक कार्यकर्ते शरद मोरे व सुनिता मोरे यांचा तो सुपुत्र आहे. चिरंजीव केयूरच्या या यशाबद्दल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संरक्षण शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा डॉ विजय खरे, सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार, आदिवासी एकता परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष प्रेमचंद सोनवणे, पत्रकार सतीश पेंढारकर, शरद चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते नितीन जगदाळे, माधव पाटील, रमेश महाले, प्रा सुधीर कासार, प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्य व शिक्षक बंधू-भगिनींनी विशेष अभिनंदन केले आहे.