घनश्याम अग्रवाल यांचा जेडीसीसी बँक निवडणुकीत दणदणीत विजय 64 पैकी 63 मते
चोपडा : विश्वास वाडे तालुका प्रतिनिधी
चोपडा : जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सोसायटी मतदार संघातुन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार घनश्याम ओंकारलाल अग्रवाल यांचा 64 पैकी 63 मत घेवून दणदणीत विजय झाला.
चोपडा येथील प्रतिष्ठित व्यापारी व उद्योजक घनश्याम ओंकारलाल अग्रवाल यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश करीत जळगांव जिल्हा मध्यवर्ती बँकेची महाविकास आघाडी तर्फे निवडणुक लढवली. यामध्ये त्यांनी काल दि. 21 रोजी झालेल्या मतदानामध्ये त्यांनी सोसायटी मतदारसंघामध्ये एकतर्फी बाजी मारली. त्यांच्या या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकत वाढणार हे मात्र नक्कीच !
घनश्याम अग्रवाल यांच्या विजयामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सोसायटी मतदार संघातून राष्ट्रवादीचे घनश्याम आग्रवाल यांची संचालक पदी निवड झाल्याने त्यांचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या निवासस्थानी फटाके फोडून जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी चंद्रहास भाई गुजराती घनश्याम पाटील गोरख तात्या पाटील जगन्नाथ पाटील प्रवीण भाई गुजराथी नगराध्यक्षा मनीषा चौधरी पंचायत समितीचे उपसभापती सूर्यकांत खैरनार नगरसेवक रमेश शिंदे कैलास सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील शहराध्यक्ष शाम परदेशी बाळासाहेब पाटील राजूभाऊ देशमुख नौमन काजी पप्पु स्वमी आसिफ सय्याद अजगर आली सय्यद भारत पाटील यशवंत पाटील प्रफुल्ल पाटील सामधान माळी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने उपस्थित होते.