नेवाडे गावात सेवानिवृत्त जवान महेश साळुंखे यांचे जंगी स्वागत, गावातुन मिरवणूक
शिंदखेडा (यादवराव सावंत) तालुक्यातील नेवाडे गावातील एकवीस वर्षे सेवा करुन सेवापुर्ती जवान महेश भगवान साळुंखे यांचा सोहळा संपन्न झाला. यावेळी गावातुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. खान्देशी रक्षक संस्थेच्या आजी माजी सैनिक व तरुणांनी मनमुराद आनंद लुटला. गावातील सर्वच कुटुंबातील सदस्यांनी औक्षण करून सर्वात केले. त्यानंतर सत्कार सोहळा पार पडला. सुरुवातीला मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले.
याप्रसंगी अध्यक्ष स्थानी माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील, प्रमुख पाहुणे शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, सरपंच लक्ष्मीकांत साळुंखे, संचालक मोतीलाल जाधव, जयवंत साळुंखे, परशुराम देवरे, खानदेशी रक्षक संस्थेचे जिल्हाध्यक्ष उल्हास पाटील, उपाध्यक्ष नितीन देवरे, शिंदखेडा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गिरासे, सहसचिव संजीव नगराळे, कार्याध्यक्ष नंदलाल साळुंखे, भुषण पवार, शांताराम जाधव,नथ्थु सुर्यवंशी, भावसिंग गिरासे, प्रमोद गुरव, दिपक मोरे, प्रमोद बोरसे, विजय चव्हाण, प्रमोद वाघ, नरेश सावंत, हर्षल पाटील, रवि माळी यांसह प्रमुख उपस्थित होते. ग्रामपंचायत, खानदेशी रक्षक संस्था, नातलग मित्रमंडळी यांनी जवान महेश भगवान यांचासह कुंटुब सत्कार करण्यात आला. माजी आमदार रामकृष्ण पाटील, जिल्हाध्यक्ष हेमंत साळुंखे, ज्ञानेश्वर गिरासे, नेहा पाटील मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन एस.एल.पाटील, तर भिकनराव साळुंखे यांनी आभार मानले.